भुसावळातील शिव मंडळार्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध उपक्रम
भुसावळ : शहरातील सराफ बाजार भागातील लक्ष्मी चौकातील शिव मंडळातर्फे दुर्गेची मोठ्या उत्साहात स्थापन करण्यात आली. यंदा मंडळाचे 50 व्या वर्षात पर्दापण असून बर्हाणपूर येथून 14 फूट उंचीची मूर्ती आणून तिची विधीवत स्थापना करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यात वृक्ष वाटप, दीप उत्सव, 56 भोग, भजन संध्या, रांगोळी स्पर्धा, फैन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
उत्सव यशस्वीतेसाठी यांचे मोलाचे परीश्रम
उत्सव यशस्वीतेसाठी उमाकांत (नमा) शर्मा, मनीष चौरसिया, विजय महाजन, मनोहर गोठवाल, सुनील अग्रवाल, अजय चौरसिया, आदित्य शर्मा, सचिन श्रीनाथ, संजय ठाकुर, सुनील शिंपी, राहुल आगरकर, शुभम चौरसिया व पदाधिकारी परीश्रम घेत आहेत.


