पळासनेर शिवारातील जुगाराचा डाव उधळला : सहा जुगार्‍यांसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त


Gambling scheme foiled in Palasner Shivar : 13 lakh worth of property seized along with six gamblers
शिरपूर :
शिरपूर तालुका पोलिसांनी पळासनेर शिवारातील चारणपाडा लगत नाल्याच्या काठी जुगारावर धाड टाकून सहा जुगार्‍यांसह सुमारे 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

या संशयीतांना अटक
मुकेश शेरु कुमावत (30, रा.मेहगाव, तालुका अजंड, जि.बडवानी मध्यप्रदेश), दगडू बलबीर बेलदार (28, रा.किस्मत नगर, शिरपूर), शाहरुख शेख सईद शेख (26, रा.कमल नगर, सेधंवा), शफी मुहमंद नियाज मोहमंद (48, रा.डाकबंगला रोड, सेंधवा, जि.बडवानी), विजय संतोष शिरसाठ (29, देवजरी कॉलनी, सेंधवा), योगेश गणेश सोनवणे (32, राम करोरा, सेंधवा जि.बडवानी) आदींना ताब्यात घेण्यात आले. 41 हजारांची रोकड सह दोन स्विप्ट डिझायर, एक बुलेट व तीन मोटार सायकली एकूण 12 लाख 71 हजार शंभर रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी प्रवीण धनगर यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील सहा 6 जणांना ताब्यात घेण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पीएसआय संदीप पाटील, भिकाजी पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास सुपडू जाधव, संजय सुर्यवशी, सुनील पाठक, अनिल चौधरी, गंगाधर सोनवणे, चत्तरसिंग खसावत, जाकोरोदीन शेख, संदीप ठाकरे, सागर ठाकूर, रोहिदास पावरा आदींनी केली.


कॉपी करू नका.