Finally approval from the state government to set up MIDC in Muktainagar मुक्ताईनगरात एमआयडीसी उभारण्यास राज्य शासनाकडून अखेर मंजुरी


Finally approval from the state government to set up MIDC in Muktainagar मुक्ताईनगर : तालुक्यातील सारोळा येथील सव्वा सहाशे एकरावर औद्योगिक वसाहत उभारण्यास राज्य शासनाने तत्वतः मंजुरी दिली असून तालुकावासीयांमध्ये या निर्णयामुळे आनंद व्यक्त होत आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार, 20 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली होती. बुधवार, 28 सप्टेंबर 2022 बुधवार रोजी दुपारी तीन वाजता मुंबई मंत्रालयात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत उद्योग मंत्र्यांनी मुक्ताईनगर मतदार संघासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यानुसार जागेची पाहणी, जागेचे सर्वेक्षण, भू निवड समितीच्या अहवालाचा संपूर्ण तपशील अशा सर्व बाबींचा आढावा घेवून सारोळा येथील सव्वा सहाशे एकरावर औद्योगिक वसाहत उभारण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली. तत्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मुक्ताईनगरवासीयांसाठी मोठी उपलब्ध
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवार, 20 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथील दौरा पार पडला. दौर्‍यानिमित आयोजित जाहीर सभेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघातील बेरोजगारी व कृषी उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठी मतदार संघात औद्योगिक वसाहत उभारण्याची मागणी केली होती. आमदारांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभेत केल्यानंतर अवघ्या आठ दिवसात घोषणेची पूर्ती केल्याने बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. आमदारांच्या पाठपुराव्याचे सर्वसामान्य जनतेतून कौतुक होत आहे.


कॉपी करू नका.