सावतर-निभोंरा शिवारात गावठी दारू उद्ध्वस्त
वरणगाव : सावतर निंभोरा शिवारातील तापी नदी काठी काटेरी झुडूपांमध्ये वरणगाव पोलिसांनी मंगळवारी सकाळी साडेेसात वाजेच्याा सुमारास छापा टाकत दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जागेवरच नष्ट करीत 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे, हवालदार मुकेश जाधव, संदीप बडगे, अतुल बोदडे यांनी सकाळी नदी काठी सुमारे एक किलोमीटर अंतर पायी जात नाल्याच्या काठावर सुरू असलेली दारूची जागेवर नष्ट केली. यावेळी तेथे असलेल्या पाच ड्रममधील एक हजार 200 लिटर नवसागर, महू, गुळमिश्रीत कच्चे रसायन असा सुमारे 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरणगाव पोलिस ठाण्यात पोलिसांनी मोहन अशोक कोळी (25) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.

