होलसेल भावात फटाके देण्याच्या बहाण्याने जळगावच्या व्यापाऱ्याला अडीच लाखांचा चुना
Fine of 2.5 lakhs to a Jalgaon businessman on the pretext of giving crackers at wholesale price जळगाव : जळगावातील व्यापाऱ्याला फटाक्यांची ऑर्डर देण्याचा बहाणा करून २ लाख ४१ हजार ५०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात सायबर पोलिसात गुन्हा
धनंजय लक्ष्मण पाटील (४८, रा. रामदास कॉलनी, आकाशवाणी चौक, जळगाव) यांना एका अनोळखी व्हॉटसॲप नंबरवरून २० सप्टेंबर रोजी शेखर माखाजी, फटाके डिलर नावाने एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यांनी धनंजय पाटील यांचा विश्वास संपादन करून होलसेल भावात फटाके देण्याच्या बहाण्याने ऑर्डर घेतली. त्यानंतर धनंजय पाटील यांनी २ लाख ४१ हजार ५०० रूपये ऑनलाईन पध्दतीने टाकले. दरम्यान, ऑर्डर घेवून दिलेल्या मुदतीत फटाके न मिळाल्याने धनंजय पाटील यांनी मंगळवार, २७ सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.


