The British-era bridge connecting the Nandurbar-Surat highway collapsed नंदुरबार-सुरत महामार्गाला जोडणारा ब्रिटीशकालीन पूल कोसळला

सुदैवाने टळली प्राणहानी : वाहतूक अन्य मार्गाने वळवली


The British-era bridge connecting the Nandurbar-Surat highway collapsed धानोरा : धानोरा, ता.नंदुरबार शहरापासून काही अंतरावर असलेल्या रंका नदीवरील ब्रिटीशकालीन पूल गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कोसळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. सुदैवाने याचवेळी पुलावरून पादचारी वा वाहनधारक जात नसल्याने मोठी प्राणहानी टळली. दरम्यान, पूल तुटल्याने मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली आहे. ब्रिटीशकालीन पूलाला शंभराहून अधिक वर्ष झाल्याने व मुदत संपल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

दोन राज्यांना जोडणारा दुवा तुटला
ब्रिटीशकाळात रंका नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली होती. महाराष्ट्रातील नंदुरबार व गुजरात्यात सुरत राज्यात जाण्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या या पुलावरून शेकडो वाहनधारक दररोज जा-ये करीत होते मात्र गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक हा पूल खचल्याने खळबळ उडाली. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन पुलावर नसल्याने अप्रिय घटना टळली. नवापूर रस्त्यापेक्षा हा रस्ता सोयीचा असल्यामुळे अवजड वाहनधारक याच रस्त्याने प्रवासाला पसंती देत होते मात्र आता पूल तुटल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली आहे.

वाहतूक दुसर्‍या मार्गावरून वळविली
पूल तुटल्यानंतर मोठ्या अवजड वाहनांसाठी निझरमार्गे तर लहान वाहनांसाठी धानोरा गावातून वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

 


कॉपी करू नका.