Two-wheeler Married Couple Dies After being hit by a tractor in Warangaon : Son injured वरणगावात दुचाकीस्वार विवाहितेचा ट्रॅक्टरच्या धडकेने मृत्यू : मुलगा जखमी


Two-wheeler Married Couple Dies After being hit by a tractor in Warangaon : Son injured वरणगाव : शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड दुय्यम उप बाजार समिती वरणगाव समोरील जून्या महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रॅक्टरने स्कूटीला धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला ठार झाली तर मुलगा किरकोळ जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला. ट्रॅक्टरचालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनोळखी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा
वरणगाव येथील दुय्यम उपबाजार समितीच्या आवारात चाटे इग्रंजी माध्यमाच्या शाळेत इ.4थीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या चिमूकल्याला घेऊन घराकडे जाण्याकरीता महामार्ग ओलांडण्याच्या तयारीत असतांना अचानक वरणगावकडून मुक्ताईनगरकडे जाणार्‍या दिशेन राखेने भरलेल ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. 34 एल.7113) ने स्कुटी (क्रमांक एम.एच.19 बी.झेड 1057) या वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार विवाहितरा ममता राजेंद्र जूबंळे (धनगर, 35, जगदंबा नगर, वरणगाव) जागीच ठार झाल्या तर त्यांचा चिमुकला लहान मुलगा जखमी झाला. या प्रकरणी रवींद्र गोविंदा धनगर (52, विकास कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील अनोळखी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परशुराम दळवी करीत आहे.

विवाहितेचा मृतदेह पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो
मयत विवाहिता ममता यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक क्षितीजा हेंडवे यांनी केले. मयताच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परीवार आहे . वरणगाव नगररीषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी राजेंद्र (भूरा) जुंबळे यांच्या पत्नी होत.

ट्रॅक्टरचालक फरार
वरणगाव परीसरात विटभट्टयांचे प्रमाण अधिक आहे. त्याकरीता दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील जळालेली राख विल्हाळे बंडात सोडलेल्या राखेचा वापर केला जात असल्याने शहरातून मोठ्या प्रमाणात डंपर व ट्रॅक्टरच्या माध्यमातून राख वीटभट्ट्यांवर आणली जाते. यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.


कॉपी करू नका.