Four Lakhs In Cash Extended Dhoom Style In Jalgaon चार लाखांची रोकड जळगावात धूम स्टाईल लांबवली


Four Lakhs In Cash Extended Dhoom Style In Jalgaon जळगाव : व्यापार्‍याकडील चार लाखांची रोकड असलेली पिशवी भामट्यांनी दुचाकीवरून येत धूम स्टाईल लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. सीसीटीव्हि फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून आहेत.

तासाभरापासून चोरट्यांची रेकी
संतोष हुकूमतमल राजपाल (45, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) यांचे तिजोरी गल्लीत होलसेल ट्रेडर्सचे दुकान आहे. राजपाल यांनी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दुकान बंद केले. दुकानबंद करण्याआधी त्यांनी गल्ल्यातील पैसे तसेच बाहेरून आलेली रक्कम असे साधारण चार लाख रुपये त्यांनी पांढर्‍या कापडी पिशवीत ठेवले. यानंतर आपल्या दुचाकीवर इतर सामान आणि त्यावर पैशांची पिशवी ठेवली.

अवघ्या काही सेकंदात पिशवी लांबवली
राजपाल हे अशोक टॉकीजच्या समोर आपल्या भावाच्या दुकानावर जाण्यासाठी थांबले. त्यांनी आपली दुचाकीवर पैशांची पिशवी राहू देत समोरच असलेल्या दुकानावर जायला निघाले. दुकानाची पायरी चढत नाही तोच, एका निळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हातोहात चार लाख रुपये असलेली पिशवी लांबवली. अवघ्या काही सेकंदात ही घटना घडल्यामुळे राजपाल हे गोंधळून गेलेत. राजपाल यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांना यश आले नाही. यानंतर राजपाल यांनी शहर पोलीस स्थानक गाठत फिर्याद दिली.

सीसीटीव्हीत चोरटे कैद, एक तासापासून दुकानाची रेकी
संतोष राजपाल यांनी परीसरासह स्वतःच्या दुकान आणि आपल्या बंधूंच्या दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. चोरटे दोन ठिकाणी सीसीटीव्हिमध्ये कैद झाले आहेत. एव्हढेच नव्हे तर चोरटे साधारण एक तासापासून राजपाल यांच्या दुकानाच्या परीसरात रेकी करत असल्याचेही कळते. दरम्यान, राजपाल यांच्याकडे एवढी मोठी रक्कम आल्याची टीप चोरट्यांना कुणी दिली होती का?, या दिशेने देखील पोलिस तपासातून माहिती समोर येणार आहे.


कॉपी करू नका.