A 26 Year Old Murderer Assaulted a 14 Year Old Girl In Tekwade शिरपूर तालुक्यातील अल्पवयीन तरुणीवर चाकूच्या धाकावर बलात्कार


A 26 Year Old Murderer Assaulted a 14 Year Old Girl In Tekwade शिरपूर : तालुक्यातील टेकवाडे येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 26 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवार, 2 रोजी पहाटे तीन वाजता घडली. या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसात आरोपी राकेश संजय कोळी (26, रा.टेकवाडे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाकूच्या धाकावर अत्याचार
14 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार, संशयीत राकेश संजय कोळी (26, रा.टेकवाडे, ता.शिरपूर) याने बुधवार, 28 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पीडित मुलगी रात्री राहत्या घराच्या अंगणातील पत्र्याच्या शेडमध्ये कुटुंबासह झोपली असताना पीडितेच्या तोंडावर रुमाल ठेवत उचलून पीडीतेला तरुणाने स्वतःच्या घरात नेले व चाकू लावून दोन वेळा अत्याचार केला. पीडीतेला या प्रकाराला विरोध केल्यानंतर तरुाने लग्नाचे आमिष दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच दुष्कृत्य करीत असतांना पीडितेच्या आई भाऊ, वहिनी समोर आले असता त्यांना चाकूचा धाक दाखवत भावाला आणि चुलत भावाला चाकूने वार करीत जखमी केले व पळ काढला. आरोपी विरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात राकेश संजय कोळीविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करीत आहेत.


कॉपी करू नका.