A youth of Jalgaon was extorted two lakhs on the pretext of giving a part-time job पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने जळगावच्या तरुणाला दोन लाखांचा गंडा


A youth of Jalgaon was extorted two lakhs on the pretext of giving a part-time job जळगाव : पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने जळगावातील तरुणाची दोन लाखात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रक्कम मिळताच भामट्यांनी संपर्क तोडला
जळगावच्या गायत्रीनगरातील रहिवासी असलेले प्रमोद दिनकर इंगळे यांना ‘मॉलकेअर मी ट्रेड स्टोअर’ या वेबसाईटवरील लिंकमध्ये जॉब बाबतची माहिती दिसल्यानंतर त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर इंगळे यांना पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळेल, असे सांगण्यात आले. या कामासाठी त्यांना पैसे भरण्याचे सांगण्यात आले. याबाबत त्यांच्या मोबाईलवर तीन जणांनी संपर्क साधला. दरम्यान या तिघांनी सांगितल्यानुसार प्रमोद इंगळे यांनी त्यांच्या अकाऊंटवर दोन लाख 3 हजार 500 रूपये भरले. यानंतर मात्र त्यांनी संपर्क टाळला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
याप्रकरणी इंगळे यांना फसवूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर तीन अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करत आहेत.