नाशिकमधील फर्निचर व्यावसायीकाचा व्यावसायीक स्पर्धेतून खून


A furniture businessman in Nashik was killed in a business competition नाशिक : स्वस्तिक फर्निचर कारखान्याचे मालक शिरीष सोनवणे यांच्या खून प्रकरणी वेल्डिंग व्यावसायिक सोमनाथ रामचंद्र कोंडाळकर (36 रा. कालिका मंदिरमागे, नाशिक) व प्रवीण आनंदा पाटील (28, रा. घुगे मळा, इच्छामणी मंदिर यांंच्यासह तिसर्‍या कारचालकाला अटक करण्यात आली आहे. सोनवणे यांचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार 10 सप्टेंबर रोजी समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 21 दिवस संशयितांचा माग काढून गुरुवारी तीन संशयितांना अटक केली.

व्यावसायीक स्पर्धेचा वाद बेतला जीवावर
व्यावसायिक शिरीष सोनवणे यांच्या खुनातील दोन्ही संशयित आरोपींचाही अंबड गाव, नाशिक येथे बेंच व इतर वस्तू बनविण्याचा व्यवसाय आहे; परंतु त्यांना फॅब्रिकेशन व्यवसायातील स्पर्धेमुळे मोठ्या ऑर्डर मिळत नव्हत्या. तुलनेत मयत यांचा बेंच बनविण्याचा मोठा कारखाना असल्याने ते कमी दरात ऑर्डर घेत होते तर आरोपींना मागील तीन महिन्यांपासून कोणतीही ऑर्डर न मिळाल्याने ते आर्थिक विवंचनेत फसले होते. त्यांच्याकडे वर्कशॉपचे व राहते घराचे भाडे देणेदेखील चार महिन्यांपासून थकित होते. त्यामुळे त्यांना पैशांची नितांत आवश्यकता असल्याने त्यांनी मयत यास धमकावून त्यांच्याकडून कामाची ऑर्डर घेण्यासाठी त्यांचे

तीन आरोपी पोलिस कोठडीत
मयत यांनी आरोपींना विरोध केल्याने त्यांनी मयतास जीवे मारल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपी क्रमांक 3 हा वाहनचालक असून, आरोपी सोमनाथ कोंडाळकर व प्रवीण पाटील यांनी गुन्हा करतेवळी वापरलेली स्विफ्ट डिझायर चालवण्यासाठी तो सोबत असल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, तिन्ही संशयितांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असून, त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.