A child drowned while swimming in the dam of Chikhli river 13 वर्षीय बालकाचा बंधार्‍यात बुडाल्याने मृत्यू


A child drowned while swimming in the dam of Chikhli river अमळनेर : तेरा वर्षाच्या बालकाचा बंधार्‍यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवार, 30 सप्टेंबर रोजी सकाळी ही धक्कादायक घटना तालुक्यातील गडखांब नगावच्या मध्यभागांतून जाणार्‍या चिखली नदीच्या आश्रम शाळेच्या मागील बंधार्‍यात घडली. अमित घुबड्या सोळंखे (13, गडखांब) असे मयत बालकाचे नाव आहे.

पोहताना बालक बुडाला
गडखांब गावातील आश्रमशाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थी अमित घुबड्या सोळंखे (13) हा गुरुवारी शाळेत जातो म्हणून मित्रांसोबत घरातून पडला मात्र आश्रमशाळेच्या मागील बाजूस असलेल्या चिखली नदीच्या बंधार्‍यावर पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला.

मृतदेह पाहताच पालकांचा हंबरडा
विद्यार्थी शाळेतून न आल्याने पालकाने त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो कुठंही आढळून आला नाही. शुक्रवारी नदी परीसरात शोध घेतला असता त्याचा मृतदेह नदीच्या बंधार्‍याजवळ दिसून आला. त्याचा मृतदेह बघून कुटुंबाने हंबरडा फोडला. आई-वडील गडखांब येथे मोलमजुरीसाठी वास्तव्यास होते. अमित हा आश्रमशाळेत इयत्ता सातवी वर्गात शिकण्यास होता. तो गावातून च ये – जा करीत असल्याचे समजते.

अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
दरम्यान अमित सोळंखी याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला. घुबड्या सोळंकी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.