Jalgaon Shocked By Murder : Wife Killed By Strangulation With Charger Wire : Accused Arrested जळगावातील तरुण विवाहितेचा पतीनेच केला खून : चारीत्र्याच्या संशयातून घटना


Jalgaon Shocked By Murder : Wife Killed By Strangulation With Charger Wire : Accused Arrested जळगाव : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत पतीने मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून पत्नीचा खून केला व काही वेळात पती पोलिसात हजर झाल्याची घटना शहरात घडल्याने खळबळ उडाली. जळगावच्या आहुजा नगर परीसरातील शिवधाम मंदिरासमोरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये शनिवारी सायंकाळी घडलेल्या घटनेत कविता जितेंद्र पाटील (20) या विवाहितेचा मृत्यू झाला तर पोलिसांनी जितेंद्र संजय पाटील (25) या संशयीत पतीला अटक केली आहे.

टोकाच्या वादानंतर आवळला गळा
जळगावच्या आहुजा नगर परीसरात ब्रह्मांडनायक अपार्टमेंट असून अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र संजय पाटील हा पत्नी कविता व दीड वर्षीय मुलीसह वास्तव्यास होता. जितेंद्र हा मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह भागवितो. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पती जितेंद्र याचा पत्नीसोबत टोकाचा वाद झाला. या वादातून जितेंद्र याने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने पत्नी कविता हिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती जितेंद्र हा स्वतःच तालुका पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने खुनाची कबुली दिली. त्यानंतर जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. तातडीने कविता हिला जिल्हा रुग्णालयात हलवल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय
धरणगाव तालुक्यातील बांभोरीतील रहिवासी असलेल्या जितेंद्रचा कवितासोबत सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला मात्र पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपी पतीला संशय असल्याने त्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. खुनाची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनीही घटनास्थळी भेट माहिती जाणून घेतली.

 


कॉपी करू नका.