An Iron Rod Was Put On The Head of a youth for not paying for alcohol in Bharat Nagar in Bhusawal : Crime Against One भुसावळातील भारत नगरात दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड : एकविरोधात गुन्हा


An Iron Rod Was Put On The Head of a youth for not paying for alcohol in Bharat Nagar in Bhusawal : Crime Against One भुसावळ : भारत नगरातील जगदीश किराणा दुकानाजवळ दारू पिण्यास पैसे मागितल्यानंतर त्यातून वाद झाला. यात शिवा शिलध्वज तिवारी (30) यांच्या डोक्यात इम्मो उर्फ तलवार इमाम पिंजारी (रा.भारत नगर, भुसावळ ) याने डोक्यात रॉड मारल्याने शिवा जखमी झाला. ही घटना गुरूवारी रात्री 7.30 वाजता घडली. शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा
भारत नगरमधील रहिवासी शिवा तिवारी हा रेल्वेतील पॅन्ट्री कारमध्ये मजुरी करतो. तो मुळचा राहणार मोहरवा, ता.सिमेरीया, मध्यप्रदेश येथील रहिवासी असून हल्ली भारत नगरात वास्तव्याला आहे. गुरूवारी रात्री साडेसातला त्याने पिंजारी याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले यावरून दोन्ही मध्ये शाब्दीक वाद झाला. यात पिंजारी याने तिवारीच्या डोक्यात जवळच पडलेला लोखंडी रॉड मारला. यात तिवारी जखमी झाला. या प्रकरणी तिवारी याच्या फिर्यादीवरून इम्मो तिवारी याच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार संजय कंखरे पुढील तपास करीत आहेे.