41 वर्षीय विवाहितेवर अत्याचार : पाचोरा पोलिसात तिघांविरोधात गुन्हा


Abuse of 41-year-old married woman: Case Against Three In Pachora police पाचोरा : शहरातील 41 विवाहितेवर दोघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा
41 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी दीपक शंकरराव कंखरे याने पीडीतेसोबत जबरदस्तीने तीन वेळा शारीरीक संबंध निर्माण केले व त्यानंतर पीडीतेच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देवून तिला व्हीडीओ कॉल केला व नग्न अवस्थेतील स्क्रीन शॉट मोबाईलमध्ये काढले. अश्लील अवस्थेतील हे फोटो सागर चंदन परदेशी याला सेंड केल्यानंतर सागरनेदेखील एक वेळा अत्याचार केला तर दीपक कंखरे याचा व्हीडिओ कॉल रीसीव्ह न केल्यास अ‍ॅसीड फेकेल, अशी धमकी देवून एका अनोळखी व्यक्तीला पीडीतेच्या घरी प्लॉस्टीकची कॅन घेऊन पाठविले. त्या अनोळखी व्यक्तीने तू दीपकचा कॉल रीसीव्ह केला नाही तर तुझ्यावर अ‍ॅसीड फेकून देईल, अशी धमकी दिली. आरोपींचा जाच असह्य झाल्यानंतर पीडीतेने पाचोरा पोलिसात तक्रार दिल्यानंतर तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अनोळखी व्यतिरीक्त दोघा आरोपींना अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत.


कॉपी करू नका.