ऑनलाईन बुकींग करताना सावधान ! : जळगावात तरुणीला 29 हजारांचा गंडा


29 thousand to a girl in Jalgaon in the name of giving things needed for Diwali festival जळगाव : दिवाळी सणासाठी लागणार्‍या वस्तूंची ऑर्डर देण्याच्या माध्यमातून राजस्थानातील भामट्यांनी जळगावातील तरुणीची 29 हजारात ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विश्वास संपादन करीत केली फसवणूक
दिशा अनिल अग्रवाल (29, रींगरोड, यशवंत कॉलनी, जळगाव) या ऑनलाईन पध्दतीने व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. दिवाळी सणासाठी लागणार्‍या वस्तू ऑर्डरनुसार त्यांनी ऑनलाईन मागवल्या होत्या. या संदर्भात साक्षी सिंग आणि पियुष जैन (दोघांचे पुर्ण नाव माहित नाही, उदयपू, राजस्थान) यांनी तरूणीचा विश्वास संपादन करून फोनपेच्या माध्यमातून 29 हजार रुपये स्वीकारले होते मात्र शुक्रवार, 21 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वस्तू न आल्याने व फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने दिशा यांनी शनिवार, 1 ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने साक्षी सिंग आणि पियुष जैन (रा.उदयपूर, राजस्थान) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे करीत आहे.