भुसावळातील सैन्यातील जवानाचे घर फोडून टीव्ही लंपास


The House Of an Army jawan in Bhusawal Was Bbroken Into And a TV Was Looted भुसावळ : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र थांबायला तयार नाही. जुन्या चोर्‍यांचा तपास थंड असतानाच नव्याने होणार्‍या चोर्‍या नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. शहरातील रामायण नगरात बंद घरातून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीचा टीव्ही लांबवल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची संधी साधली
भुसावळातील रामायण नगरातील रहिवासी मनीष कृष्णकुमार पाठक हे भारतीय भूसेनेत नोकरीला असून प्लॉट क्रमांक 73 मध्ये त्यांचे आई-वडील वास्तव्यास आहेत. पाठक कुटुंबिय हे दरभंगा येथे गेल्याने कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी 14 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर 2022 दरम्यान साधत घरातील महागडा 20 हजार रुपये किंमतीचा टीव्ही लंपास केला. शेजारील रहिवासी राधामोहन बक्तानी यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी मनीष पाठक यांना घरफोडीची माहिती कळवली. पाठक हे कर्तव्यावर असल्याने त्यांनी मित्र व तक्रारदार रवींद्र खुशालराव पाटणकर (लिंपस क्लब, भुसावळ) यांना खातरजमा करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी पाहणी केल्यानंतर घरातून केवळ एलईडी टीव्ही चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.