भुसावळात भांडणाच्या तयारीतील तिघांकडून कोयत्यासह सुरा जप्त


A gun along with a gun seized from the trio who were preparing for a fight in Bhusawal भुसावळ : बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्पना रसवंतीजवळ भांडणाच्या तयारीत असलेल्या तिघांच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संशयीतांच्या ताब्यातून कोयता, सुरा जप्त केला असून या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रशांत नीळकंठ सोनार यांच्या फिर्यादीनुसार आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

भांडणापूर्वीच केली कारवाई
शहरातील जामनेर रोडवरील कल्पना रसवंतीजवळ धारदार शस्त्रांसह तीन संशयीत उभे भांडणाच्या तयारीत असल्याची माहिती बाजाजपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, नाईक महेश चौधरी, प्रशांत सोनार, हेमंत जांगळे, जीवन कापडे, होमगार्ड महेंद्र आव्हाड, शशीकांत आव्हाड आदींनी शनिवारी रात्री 11 वाजता वाजता घेत संशयीत सगीर खान करीम खान, साहील खान अजीज खान, अजीज खान इस्लाम खान (द्वारका नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेतले. संशयीतांच्या ताब्यातून सुरा व कोयता पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी प्रशांत सोनार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.