भुसावळात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात
भुसावळ : शहर व परीसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात आले.
महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती
भुसावळ : शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक नारायण घोडके, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे होते. मानव भंगाळे, पूर्वेश धांडे, श्रेयस लबडे, आर्यन वानखेडे, ओम चौधरी, शिवतेज गिरनारे, आदित्य नारखेडे, यश शुक्ला या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. योगेश नरोटे, ऋषिकेश मिस्तरी व ऋषिकेश पाटील या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींवर आधारीत गीत सादर केले. शिक्षकांच्या वतीने दीपाली भट व प्रशांत मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ताप्ती पब्लिक स्कूल
भुसावळ : ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनावर आधारीत नाटिका सादर केली. दांडी यात्रेचा सजीव देखावा याप्रसंगी सादर करण्यात आला. प्राचार्या नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनिस खान, श्रद्धाली घुले, शेख कय्युम, अनिता वाणी, प्रतिभा काकडे, माधुरी गाजरे, गौरी प्रभुदेसाई, मनप्रीत कौर, सोनाली मुजुमदार, स्मिता जाधव, हर्षला चौधरी, एनेट मारथ्यू, गोपाल जोनवाल, अकबर शेख, विजय संकट, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
भुसावळ भाजपातर्फे राष्ट्रपित्यांना अभिवादन
भुसावळ : भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे भुतपूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते शहरातील महात्मा गांधी पुतळ्यास व संपर्क कार्यालयात लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, माजी नगरसेविका दीपाली बर्हाटे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, पिंटू ठाकूर, निक्की बत्रा, गिरीश महाजन, अजय नागराणी, सतीश सपकाळे, राजु खरारे, विशाल जंगले, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, प्रा.विलास अवचार, संजय बोचरे, सागर चौधरी, गोपीसिंह राजपूत, भारत उमरीया, विक्की गोहर, सागर जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
