यावल एस.टी.आगारातील चालकास बस अंगावर का आणली म्हणत मारहाण : एकाविरोधात गुन्हा


यावल : यावल-चोपडा रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ यावल एस.टी.आगारातील एस.टी. बसला एका दुचाकी चालकाने अडवत चालकास तू बस अंगावर का आणली ? असे म्हणत मारहाण करण्यात आली व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याने यावल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चालकाविरोधात गुन्हा
यावल एस.टी. आगारातील चालक प्रवीण प्रभाकर सोनवणे (37) हे बस घेऊन अंकलेश्वर -बर्‍हाणपूर राज्य मार्गावरून चुंचाळे फाट्याजवळून येत असताना त्यांची दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 बी. व्ही. 0129) वरील अज्ञात चालकाने अडवत बस चालकाला तू अंगावर बस आणल्याचा आरोप करीत प्रवीण सोनवणे यांची कॉलर पकडून त्यांना एस.टी. बसच्या बाहेर ओढत चापटा-बुक्क्यांनी छातीवर, पोटावर मारहाण केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अज्ञात दुचाकी धारकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !