तुळजापूर जाणार्‍या भाविकांवर क्रुर काळाचा घाला : विचित्र अपघातात पाच भाविक ठार


Cruel attack on devotees going to Tuljapur : Five Devotees Killed In Freak Accident लातूर : रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालवकाने कार वळवताच ही कार समोरून येणार्‍या एसटी बसवर जाऊन धडकल्याने पाच भाविकांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी लातूर-उदगीर रस्त्यावर हैबतपूर पेट्रोल पंपाजवळ कार व एस.टी.महामंडळाच्या बसमध्ये हा अपघात घडला.

तुळजापूर जाताना अपघात
उदगीर येथून कुटुंब कारने (एम.एच.24 बी.ओ. 4080) सकाळी8.30 च्या सुमारास निघालं होतं. कारमधून सहा जण तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते. लातूर- उदगीर रस्त्यावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालवकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरून येणार्‍या एसटी बसवर जाऊन धडकली. अपघातानंतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

यांचा अपघातात मृत्यू
या अपघातात अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख व चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर यांचा मृत्यू ओढवला प्रियंका गजानन बनसोडे गंभीर जखमी आहे. सर्व मृतदेह उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !