मी निवडून येण्याची खात्री असतानाही न मागता रोहिणी खडसेंना दिले तिकीट


माजी मंत्री एकनाथराव खडसे : भाजपातील काही लोकांनीच षडयंत्र रचल्याचा केला आरोप

बीड : पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवामागे षडयंत्र असल्याचा आरोप खडसेंनी पुन्हा एकदा केला. मी निवडून येण्याची खात्री असताना मला पक्षाने तिकीट नाकारलं तर रोहिणी खडसे इच्छूक नसताना त्यांना पक्षाने जबरदस्तीने तिकीट दिलं, असा टोला पुन्हा भाजपाला ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लगावला आहे. एकनाथराव खडसे स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी परळीत गोपीनाथ गडावर उपस्थित आहेत. यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

ज्यांना तयार केले त्यांनी विश्‍वासघात केला -खडसे
खडसे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी हसत-खेळत राजकारण केलं. आजच्या नेतृत्वात ते गुण नाहीत. मदत करण्याची भावना नेतृत्वात राहिली नाही, तर द्वेशाची, मत्सराची भावना आहे. ज्या लोकांना आम्ही विश्वासाने तयार केलं त्यांनी विश्वासघात केला, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवेळी मदत केली. आजची राजकारणातील परिस्थिती पाहता मुंडे साहेब सोबत असते तर ही वेळ आली नसती. सर्वात महत्त्वाचे गोपीनाथ मुंडेंनी पाठीत खंजिर खुपसण्याचं काम कधी केलं नाही, समोरासमोर लढले, विश्वासघात केला नाही. मेहनत केलेल्या लोकांवर आज अन्याय होतोय आणि अपमानही केला जात आहे, अशी भावना खडसेंनी व्यक्त केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !