स्व.मुंडेंंनी पाठित कधीही खंजीर खुपसला नाही
माजी मंत्री एकनाथराव खडसे : आठवणींना उजाळा देताना नाथाभाऊ भावूक
परळी : शेठजी, भटजींचा पक्ष असे जेव्हा हिणवले जात होते त्या पक्षाला बहुजनांचा चेहरा देण्याचे काम, स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केले व त्यांनी कधीही पाठित खंजीर खुपसला नाही, समोरून ते नेहमी लढले, अशी आठवण सांगत माजी मंत्री एकनाथराव खडसे येथे भावूक झाले. एकनाथराव खडसे स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी गुरूवारी परळीत गोपीनाथ गडावर उपस्थित असताना बोलत होते. यावेळी स्व.गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
(अपडेट बातमीसाठी लिंक सतत रीफे्रश करा)


- खडसेंच्या भाषणातील मुद्दे
पराभवाचे शल्य तुम्हाला आहे, मला आहे, झाले गेले विसरून जा, कुणी घडवून आणले हे सर्वांना ठावूक आहे, पंकजाच्या जीवनात आता एकही प्रसंग अपयशाचा येवू देवू नका
माझ्याजवळ खूप काही आहे, येथे बोलण्यासाठी वेळ नाही
पंकज कणखर, वाघाची मुलगी आहे
नाथाभाऊंचा गुन्हा काय, ते तर सांगा!, जनतेला खात्री मात्र पक्षाला नाही
पक्षात राहून न्याय देत नसाल तर जीव गुदमरणाच
माझ्या जीवनात जो प्रसंग आता तो पंकजाच्या जीवनात येवू, ही परमेश्वराकडे प्रार्थना
मी अधिक बोललो, तर पक्ष शिस्तभंगाची कारवाई होईल
मुंडे अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय आपला
मी पक्षात राहिल हे गृहित धरू नका
स्व.मुंडे राहिले असते तर आज नाथाभाऊ मुख्यमंत्री राहिला असता
स्व.मुंडे साहेबांची आठवण आल्यानंतर ओक्साबोक्सी रडावेसे वाटतं
कार्यकर्ते आहेत म्हणूनच आम्ही जगत आहोत
पक्षाने सांगितले आहे की पक्ष विरोधात बोलू नये