भुसावळात इलेक्ट्रीक दुकान फोडून 67 हजारांचे साहित्य लांबवले

जुन्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास लागत नसताना नवीन चोर्‍यांमुळे व्यापारी धास्तावले


In Bhusawal, an electrical shop was broken into and materials worth 67,000 were stolen भुसावळ : शहरातील खडका गावाजवळील व्यापारी संकुलातील इलेक्ट्रीक दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करीत 67 हजारांचे साहित्य लांबवल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आल्यानंतर बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा मोर्चा दुकानांकडे
शहरात आधीच चोरी-घरफोडीमुळे शहरवासी धास्तावले असताना चोरट्यांनी आपला मोर्चा बंद दुकानांकडे वळवला आहे. खडका गावाजवळील नवीन ईदगाह व्यापारी संकुलात तक्रारदार मोहम्मद फिरोज मोहम्मद नसीम खान यांचे आयान इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स नामक दुकान आहे. सोमवारी रात्री 10 वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले व मंगळवारी सकाळी दहा वाजता दुकानावर आल्यानंतर त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त दिसून आला. चोरट्यांनी दुकानामागील खिडकी तोडत दुकाना प्रवेश करून 67 हजारांचे साहित्य लांबवल्याने खान यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली.

अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
चोरट्यांनी इलेक्ट्रीक दुकानातील पाच हजार रुपये किंमतीच्या तीन विद्युत मोटर, दहा हजार रुपये किंमतीच्या लहान विद्युत मोटार, कुलरसाठीच्या अडीच हजार रुपये किंमतीच्या पाच मोटर, आठ हजार रुपये किंमतीचे पंख, तीन हजार रुपये किंमतीच्या इस्त्री, साडेचार हजार रुपये किंमतीचे केबल बंडल, 30 किलो वजनाची व 20 हजार रुपये किंमतीची तांब्याची तार, हॅण्ड ग्राईंडर, मोटार, घरगुती टेप तसेच सात हजारांची रोकड मिळून एकूण 67 हजारांचे साहित्य लांबवले. चोरीची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरीखक मंगेश गोंटला, हेड कॉन्स्टेबल सुभाष साबळे व अन्य कर्मचार्‍यांनी पाहणी केली. परीसरातील सीसीटीव्ही फुटेज आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !