भुसावळात निकृष्ट कामाची ओरड : दहा महिन्यांत तिसर्‍यांदा बुजवले खड्डे


भुसावळ : पालिकेने शहरातील राष्ट्रपिता गांधी पुतळा ते महाराणा प्रताप चौक या मार्गावर डांबरीकरण करण्याऐवजी खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिल्याने नागरीकांमधून नाराजी व्क्त होत आहे. गेल्या दहा महिन्यांत तब्बल तिसर्‍यांदा रस्तावरील खड्डे बुजवण्यात येत असल्याने या खर्चातून रस्त्याचे डांबरीकरण करता आले, असे असेही नागरीक बोलत आहेत.

दहा महिन्यात तिसर्‍यांदा डागडूजी
शहरात डिसेंबर 2021 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजि पवार यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने गांधी पुतळा ते महाराणा प्रताप चौक या न्यायालय, पंचायत समिती, शहर पोलिस ठाण्यासमोरील रस्त्याची डागडूजी करण्यात आली. यानंतर गणेश विसर्जनावेळी डागडूजी करण्यात आली तर आता सोमवारी पालिकेने या रस्त्याच्या डागडूजीचे काम हाती घेतले असून मंगळवारीदेखील ते सुरूच होते. अवघ्या दहा महिन्यांत तीनवेळा एकाच मार्गावरील खड्डे बुजविण्याची वेळ पालिकेवर कशी आली? यापूर्वी खड्डे बुजविण्याचे कामही गुणवत्तापूर्वक झाले नाही काय? असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. उत्सव किंवा मंत्र्यांच्या दौर्‍यांपूर्वी खड्डे बुजविले जातात, मात्र या रस्त्याचे एकाच वेळी डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण का होत नाही? असा प्रश्न नागरीक उपस्थित करीत आहेत. महत्वाचा मार्गावर काँक्रिटीकरण अथवा डांबरीकरण करावा व नाहक होणारा खर्च टाळावा, अशी अपेक्षा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !