खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप
रावेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त रावेर ग्रामीण रुग्णालयात गरजु रुग्णांना फळ व बिस्किट वाटपाचे करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी रावेर कृषी उपन्न बाजार समितीत तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित झाल्यानतंर त्यांनी रावेर ग्रामीण रुग्णालय गाठून फळ वाटप केले. राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, युवक उपाध्यक्ष चेतन पाटील, युवक शहराध्यक्ष असलम शेख, युवकध्यक्ष अजंदे, महेंद्र पाटील, सोनू पाटील, डॉ.स्वप्निशा पाटील, प्रियंका बोंडे आदींची उपस्थिती होती.

