नागरीक संशोधन बिल रद्द करा : जिल्हा काँग्रेस कमेटीची मागणी


भुसावळ : नागरीक संशोधन बिल रद्द करा : जिल्हा काँग्रेस कमेटीची मागणी समाजात तेढ निर्माण करणारे ागरीक संशोधन बिल रद्द करावे, अशी मागणी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे करण्यात आली. निवेदनाची प्रत राष्ट्रपतींनाही पाठवण्यात आली आहे. हे बिल मुस्लीम समाजाच्या विरोधात असल्याने ते तातडीने रद्द करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन देताना जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मो.मुन्वर खान, उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेंद्रसिंह पाटील, शहराध्यक्ष सलीम गवळी, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, ईस्माईल गवली, जॉनी गवली, मकबुल मेंबर, शकील बागवान, शैलेंद्र नन्व्वरे, भगवान मेढे, इब्राहीम खान ऊर्फ राजा, मेहेबूब खान, अकील शाह व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !