ट्रक दरीत कोसळून चालकाचा मृत्यू : कन्नड घाटातील घटना
चाळीसगाव : औरंगाबादकडून चाळीसगावकडे येत असलेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तो कन्नड घाटाच्या पायथ्याच्या उतारावर दरीत कोसळल्याने चालकाचा मृत्यू ओढवला. गुरुवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. या अपघतात चालक आसीफ नवाज पठाण (वय 22) हा ठार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार ट्रक (एम.एच.20 सी.टी.0306) हा औरंगाबादकडून चाळीसगावकडे घाटातून येत असताना ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तो खोल दरीत कोसळला. क्रेनच्या सहाय्याने दरीत कोसळलेली गाडी काढण्यात आली.
