सामनेरला वृद्ध शेतकर्याची रेल्वेखाली आत्महत्या
पाचोरा : तालुक्यातील सामनेर येथील सखाराम दुशाल पवार (67) या वृद्ध शेतकर्याने नापिकी व वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत 12 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेतालगत असलेल्या रेल्वे लाईनवर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. गुरुवारी 12 रोजी सकाळी शेतात जाऊन येतो, असे सांगून ते गेले आणि शेताला लागून असलेल्या रेल्वे रुळावरून येणार्या धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केलीे. त्यांच्या पश्चात्त पत्नी, दोन मुले, सुन, नातवंडे असा परीवार आहे. घटनेचा पंचनामा सहाय्यक फौजदार रामदास चौधरी यांनी केला.

