रावेरात विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन


रावेर : विविध मागण्यांसाठी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) रावेर तालुका शाखेतर्फे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रीपाईचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला. नायब तहसीलदार चंदू पवार यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील ग्रामपंचायतीद्वारे कर वसूल करण्यात येणार्‍या अतिक्रमित धारकांना सुविधा द्याव्यात, सर्वांसाठी घरे या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ग्रामीण भागातील अतिक्रमित जागा निवासासाठी उपलब्ध करून देण्याच्या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करावी, स्वस्त धान्य दुकानातून प्रमाणापेक्षा लाभार्थींना कमी धान्य दिले जाते तसेच दुकानदार पावती देत नाहीत याची चौकशी करावी, यासह विविध मागण्यांसाठी येथील डॉ. आंबेडकर चौकात हा रास्ता रोको करण्यात आला.

यांचा आंदोलनात सहभाग
रास्ता रोको आंदोलनात पक्षाचे तालुकाध्यक्ष विकी तायडे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ तायडे, तालुका सचिव कमलाकर गाढे, शे.अशरफ, शे.इकबाल, शेखर भालेराव, चांगो भालेराव, नरेंद्र तायडे, किरण ढिवरे, राहुल अडीवल, देवानंद मशाने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील विवरा, पाल, रसलपूर, मोरगाव बुद्रुक, अहिरवाडी गावातील नागरीक उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !