मोबाईलच्या अतिवापरामुळे संशोधन वृत्तीला बसली खीळ


आमदार संजय सावकारे : भुसावळात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

भुसावळ : विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे, मोबाईलचा वापर चुकीच्या पद्धतीने होत असल्याने संशोधन वृत्ती कमी झाली असून गरजेपुरता मोबाईलचा वापर करावा व पुस्तके वाचन व आपला छंद जोपासत मैदानी खेळावर भर द्यावा, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी येथे केले. बियाणी इंग्लिश व मराठी मीडियम स्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

समाजाला फायदेशीर असणारे असावे संशोधन
आमदार म्हणाले की, संशोधन हे आताच्या समस्यांवर ती आधारीत असले पाहिजे. समाजाला फायदेशीर संशोधन झाले पाहिजे. वीज पाणी व आरोग्य यावरती अधिक संशोधनाची गरज आहे. दैनंदिन जीवनात वावरताना आपले हक्का सोबतच कर्तव्याची जाण असली पाहिजे, विज्ञानाने प्रगती केलेली आहे या प्रगतीमुळे मानवासाठी अनेक सुखसोयी निर्माण झालेले आहेत परंतु याचा योग्य वापर होणेदेखील गरजेचे आहे.

80 शाळातील 120 विद्यार्थ्यांचा सहभाग
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बियाणी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले. यानंतर सरस्वती पूजन व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची माहिती सांगत 80 शाळातील 120 विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला तसेच या प्रदर्शनात वीज पाणी व दैनंदिन समस्यांवर ती विद्यार्थ्यांनी आपले उपकरणाची मांडणी केली असल्याचे सांगितले. जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी ही मार्गदर्शन केले.

यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती
अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे तर उद्घाटक जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे व उद्योगपती मनोज बियाणी होते. प्रमुख पाहुणे भुसावळ पंचायत समितीच्या सभापती प्रीती पाटील, जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, रवींद्र पाटील, गटविकास अधिकारी विलास भाटकर, बियाणी स्कूलच्या सचिव संगीता बियाणी, विस्ताराधिकारी तुषार प्रधान, रागिणी चव्हाण, केंद्रप्रमुख संजय श्रीखंडे, भिकारी बोदडे, नलिनी झांबरे, बियाणी स्कूलच्या प्राचार्य सोफिया फ्रान्सिस उपस्थित होत्या. सूत्रसंचालन निशा पाटील यांनी तर आभार एस.एस.अहिरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी बियाणी स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल
प्राथमिक विद्यार्थ्यांचा गट- प्रथम यश विजय कोळी, महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव (शेतकर्‍यांची तोफ), द्वितीय- संकेत उत्तम बाविस्कर, ज्ञानज्योती विद्यालय, खडके (लेझर अलाराम), तृतीय – वृषभ पंकज येवले, के. नारखेडे विद्यालय, भुसावळ (डीसी टू एसी कर्न्व्हटर), उत्तेजनार्थ- नम्रता सोनवणे, जि.प.शाळा, वांजोळे (शैक्षणिक साहित्य व उपकरणे), अक्षदा देवडा, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ (शैक्षणिक खेळ आणि गणीतीय प्रतीकृती) , रामचंद्र मेहेरे, जि.प.शाळा कन्हाळे, (फळबाग पाणी बचत)

माध्यमिक विद्यार्थी गट- प्रथम- हर्ष मुराई, बियाणी माध्य. विद्यालय इंग्रजी माध्य. भुसावळ (वेस्ट मॅनेजमेंट), द्वितीय- प्रतीक वारके, एच.के.बढे विद्यालय, पिंपळगांव खुर्द (मॉडर्न ऑरगॅनिक फर्टिलायझर), तृतीय- सेजल नारखेडे, सेंट अलॉसेस हायस्कूल, भुसावळ (मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस), उत्तेंजनार्थ- लेतेश बारी, रा.धो.माध्य. विद्यालय कुर्‍हेपानाचे, (सोलर ट्रॅक्टर),
महेश तुळशिराम नारखेडे, एन.के.नारखेडे इंग्लिश मेडीअम स्कूल, भुसावळ (चंद्रयान 2), वेदांत पाटील, नेहरू विद्यालय, तळवेल, (थ्रीडी एमआय),

प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य
प्रथम मेघ:शाम एकनाथ सपकाळे, जि.प.शाळा, किन्ही, (गणितीय फलक),
उत्तेजनार्थ- सरोज मंत्री, डी.एल.हिंदी विद्यालय, भुसावळ (हसत खेळत
गणित), ज्योती बेलसरे, जि.प.शाळा, टहाकळी, (गणितीय प्रतिकृती)

माध्यमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य- प्रथम- कविता अग्रवाल, डी.एल. हिंदी विद्यालय, भुसावळ, (डी.एन.ए मॉडेल), उत्तेजनार्थ- स्वाती राणे, बियाणी स्कूल, मराठी (विविध विषयक प्रतिकृती)

यांनी केले परिक्षण
अमोल वाणी (आर.टी.काबरे विद्यालय, एरंडोल), प्रदीप नारखेडे (आर.टी.काबरे विद्यालय, एरंडोल), अमित परखड (माध्य. विद्यालय, जामठी
ता.बोदवड), पी.व्ही.पाटील (भारत विद्यालय, न्हावी ता यावल), भूषण वाघुळदे, (ज्योती विद्या मंदिर, सांगवी, ता.यावल) भास्कर वारके (श्रीकृष्ण हायस्कूल, शिंदी, ता.भुसावळ), यशवंत धायगुडे (विषय शिक्षक),
डी.आर.फेगडे (धनाजी नाना विद्यालय, खिरोदा, ता.यावल)




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !