Dhadak campaign of Bhusawal Municipality : Fine for shopkeepers who give plastic carry bags  भुसावळ पालिकेची धडक मोहिम : प्लॅस्टीक कॅरीबॅग देणार्‍या दुकानदारांना दंड


Dhadak campaign of Bhusawal Municipality : Fine for shopkeepers who give plastic carry bags भुसावळ : भुसावळ पालिका प्रशासन आरोग्य विभाग व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात सोमवारी प्लास्टीक कॅरीबॅग वापर करणार्‍या दोन दुकानदारांवर दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. ऐन दिवाळीच्या काळात या कारवाईमुळे बाजारात खळबळ उडाली. या कारवाईत 40 किलो प्लस्टीक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.

संयुक्त कारवाईने उडाली खळबळ
शहरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी ताराचंद ठाकरे, पालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी प्रदीप पवार, आरोग्य निरीक्षक व्ही.सी. राठोड, नोडल अधिकारी नितीन लुंगे यांच्या पथकाने बंदी असलेल्या कॅरीबॅगचा वापर करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई केली. शहरातील घासीलाल शेठ नमकिन दुकानदारास पाच हजार रुपये तर यशवंत दुग्धालय यांना पाच हजार रुपये असा दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

40 किलो प्लॅस्टीक कॅरीबॅग जप्त
या कारवाईत 40 किलो प्लस्टीक कॅरीबॅग जप्त करण्यात आली. पथक आल्याची माहिती मिळताच अनेक दुकानदार व हातगाडीवरुन खाद्यपदार्थ, फळे विक्रेत्यांनी प्लास्टीक पिशव्या दुकानावर हलवल्या. सुमारे 50 हातगाडी विक्रेत्यांकडेही तपासणी करण्यात आली. या ठिकाणी कॅरीबॅग आढळून आल्या नाहीत मात्र अशा विक्रेत्यांना यापूढील काळातही विक्री किंवा वापर करु नये, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !