An Iron Rod Hit One On The Head In Bhusawal : Crime Against Four भुसावळात एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला : चौघांविरोधात गुन्हा
An Iron Rod Hit One On The Head In Bhusawal : Crime Against Four An Iron Rod Hit One On The Head In Bhusawal : Crime Against Four भुसावळ : शौचालयात पाणी टाकले नाही या कारणावरून एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून मारहाण करण्यात आली. ही घटना गौसिया नगरातील लकी किराणाजवळ गुरुवारी सकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
तक्रारदार शेख दस्तगीर शेख फरीद (33, गौसिया नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी शेख कासम, शबानो बानो, परवेज, आवेश (पूर्ण नाव माहित नाही) यांनी शौचालयात पाणी टाकले नाही म्हणून विचारणा केल्यानंतर पाणी टाकले आहे, तुम्ही पाहून घ्या, असे म्हटल्याचा राग आल्याने शिविगाळ करीत मारहाण केली तसेच आवेशने डोक्यात लोखंडी रॉड मारून दुखापत केली.
