भुसावळात इनरव्हील क्लबतर्फे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर


भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ यांच्या सहकार्याने आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिलांसाठी स्तन व गर्भाशयाच्या कॅन्सरवर मार्गदर्शन व प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ.दीपा रत्नानी व डॉ.दीप्ती चौधरी यांनी महिलांना आरोग्यासंबंधी मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊनच्या मॅमोग्राफी वाहनात महिलांची मोफत मेनोग्राफी व पेप्समियर टेस्ट करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले. शहरातील म्युन्सीपल हायस्कूलमध्ये आयोजित या शिबिरात महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला.

यांची शिबिराला उपस्थिती
डॉ.दीपा रत्नानी व डॉ.दीप्ती चौधरी यांनी महिलांना स्तन कॅन्सर व गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी असलेले गैरसमज दूर करून तपासणी व मार्गदर्शन केले. या उपक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता दवंगे, डॉ.रश्मीजी शर्मा, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती देव, सचिव वंदिता पारे, रुचिका शर्मा, नगरसेविका सोनल महाजन, शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन पद्मा दरगड यांनी केले. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले. मंडळाच्या सदस्या अनिता आंबेकर, श्रध्दा चौधरी, जयश्री चौधरी, योगीता खडसे, अर्चना सोनवणे, भारती वानखेडे यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !