हॉटेल व्यावसायीकाच्या घरातून मोबाईल लांबवले


Two mobile phones were stolen from the same house in Jamner जामनेर : जामनेर शहरातील महावीर नगरातील एका घरातून दोन मोबाईल चोरट्यांनी लांबवले. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून लांबवले मोबाईल
हेमंत शांताराम वाणी (48, रा. महावीर मार्ग, जामनेर) हे हॉटेल व्यवसासीक आहे. बुधवार, 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते 8.30 दरम्यान त्यांच्या घरातील 45 हजारांचे दोन मोबाईल आज्ञात चोरट्याने चोरून नेले. त्यांनी घरात सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला. परंतु मोबाईल कुठेही मिळून न आल्याने अखेर त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल साहिल तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !