In Jalgaon, Dhoom Style Lakh Mangalpot was extended by Bhamtas जळगावात भरदिवसा धूम स्टाईल लाखाची मंगलपोत भामट्यांनी लांबवली


In Jalgaon, Dhoom Style Lakh Mangalpot was extended by Bhamtas जळगाव : शहरातील निमखेडी शिवारातील चंदूआण्णा नगरातून पायी जाणार्‍या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीची व साडेचार तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत पल्सरवरून आलेल्या भामट्यांनी धूम स्टाईल लांबवली. ही घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

धूम स्टाईल लांबवली मंगलपोत
जळगावच्या निमखेडी शिवारातील साई विहार कॉलनीतील रहिवासी विजया दिलीप पाटील (60) या गुरुवार, 27 ऑक्टोबर रोजी निमखेडी रस्त्याने जात असतांना विना क्रमांकाच्या मोटार सायकलवरील दोघा अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून पलायन केले. महिलेने आरडा-ओरड केली मात्र तो पर्यंत भामटे पसार झाले. तपास पोलिस उप निरीक्षक नयन पाटील करत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !