Jewels worth two lakhs were sent from Jalgaon to an old woman of Kathora Village कठोरा गावातील वृद्धेचे जळगावातून दोन लाखांचे दागिने लांबवले
Jewels worth two lakhs were sent from Jalgaon to an old woman of Kathora Village जळगाव : तालुक्यातील कठोरा येथील 70 वर्षीय वयोवृद्धा जळगावात कामानिमित्त आल्यानंतर भामट्याने सुभाष चौकातील सुभाष डेअरीसमोरील दोन लाख 11 हजार 200 रुपये किंमतीचे दागिने लांबवले होते. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
भामट्याने संधी साधत लांबवले दागिणे
शनिवार, 22 ऑक्टोंबर 2022 रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी जळगाव तालुक्यातील कठोरा येथील यशोदा संतोष कोळी (70, कठोरा) या दिवाळीनिमित्त खरेदीनिमित्त जळगावी आल्या असताना दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजेच्या दरम्यान त्यांच्याकडील कापडी पिशवीची चैन उघडून दोन लाख 11 हजार 200 रुपये किंमतीचे दागिने लांबवले. या प्रकरणी वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार परीष जाधव करीत आहेत.
