बैलांची कोंबून वाहतूक करणारा ट्रक पकडला
फैजपूर : रावेर शहराकडून कत्तलखान्याकडे 20 बैल कोंबून त्यांची वाहतूक करणारा ट्रक येथील सुभाष चौकात पकडण्यात आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवून पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर ट्रकमधील बैलांची मुक्तता करून त्यांची वढोदा येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली. शनिवारी रात्री आठ वाजता ट्रक (आरजे 05 जी बी 2309) मध्ये पाट्या लावून वर बटाट्याच्या गोण्या रचल्या होत्या आणि त्या खाली 20 बैल अक्षरश: कोंबून भरले होते. गाडीतच दोन बैलांचा मृत्यू झाला होता. सावदा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी फैजपूरच्या कार्यकर्त्यांना कळवले. ट्रक पकडताच चालक पसार झाला.

