आरक्षणामुळे मराठा समाजाला लाभ
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे मत
रावेर : देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा युवक-युवतीं लाभ घेऊन शिक्षण आणि नोकरीत पुढे जावे. आमच्या महामंडळाने दहा हजार मराठा युवकांना 550 कोटीचे कर्ज देऊन त्यांना उद्योग-धंद्यात उभारी देण्यासाठी मदत केली असल्याचे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
रेशीमबंधचे प्रकाशन
मराठा समाज वधू-वर परीचय मेळाव्याच्या कार्यक्रमा निमित्त पाटील रावेरात आले होते. यावेळी वधु-वर परिचय पुस्तिका रेशमबंधाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशक करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ अरुणदादा पाटील होते तर प्रमुख मांन्यवरांमध्ये आमदार चंद्रकांत पाटील,बुर-हाणपुर जनपद अध्यक्ष किशोर पाटील,बुर-हानपुर महापौर अनिल भोसले उद्योजक श्रीराम पाटील,जितेंद्र पवार, जिल्हा परिषद सदस्य रंजनाताई पाटील,माजी सभापती निळकंठ चौधरी,जितेंद्र मराठे,शाहपुर नगराध्यक्ष शोभाताई लांडे, सौ कविता पवार,मुख्याधिकारी रविंद्र लांडे,किशोर चव्हाण,एल ए पाटील,रमेश पाटील, सोपन पाटील, योगराज पाटील, ज्ञानेश्वर महाजन, आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी घन:श्याम पाटील प्रशांत पाटील, सि एस पाटील,योगराज महाजन,विनोद चौधरी,आर बी महाजन,डॉ सुरेश पाटील यांनी परीश्रम घेतले.
नोकरीपेक्षा उद्योग धंद्याकडे वळावे
मराठा समाजाच्या युवक युवती यांनी नोकरीच्या मागे न धावत इतर क्षेत्राकडे आपण वळावे जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपले अस्तित्व निर्माण करावे मराठा समाजाच्या ताकदीमुळेच मी आमदार झाल्याचे चंद्रकात पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाचा पारंपरीक व्यवसाय शेती दिवसें-दिवस शेती कमी होत चालली असून यावरच अवलंबून न रहता चाकोरीच्या बाहेर जाऊन इतर उद्योग-धंद्याकडे वळावे यामध्ये महेनत कष्ट करून यश संपादन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अरुणदादा पाटील
यांनी केले

