भुसावळातील प.क. कोटेचा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
भुसावळ : शहरातील श्रीमती प. क. कोटेचा माध्यमिक विद्यालयाच्या 2000-2001 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत मेळाव्याचे आयोजन करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शाळेची शिस्त ठरली आयुष्यात उपयोगी
यावेळी शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका संध्या कुलकर्णी, शाळेतील कला प्रेमी शिक्षक अनिल कोष्टी, ईश्वरदास खंडेलवाल, मधुकर घाटे, एस.डी.पाटील, वल्लभ कुलकर्णी यांच्यासह शिपाई संजय दुतोंडे, विजूदादा, धनराजभाऊ उपस्थित होते. मुख्याध्यापिका संगीता राणे यांनी विद्यार्थ्यांना पुढील उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेची शिस्त व रुजवलेली मूल्य आयुष्यात उपयोगी ठरल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


यांची मेळाव्याला उपस्थिती
यावेळी माजी विद्यार्थी मंगेश सोनवणे, उमाकांत सोनवणे, पवन रोकडे, प्रीती पाठक, सपना पाटील हर्षाली पारसे, अनंता कांबळे, मुकुल तरसोदे, हर्षा पाटील, कल्याणी भंगाळे, चारुलता मोरे, मृदुला मुजुमदार, उमेश शिंदे, सचिन बागुल, परशुराम बेलसरे, लवांकुश सावरखेडकर, कविता कमोदे, रूपाली नेहते, शिल्पा घुले, पुनम कांबळे, सपना राणे, पवन सोनार, रफिक पटेल, प्रवीण मेघे उपस्थित होते. आभार पवन रोकडे यांनी मानले.