अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय
Rituja Latke’s resounding victory in the by-election मुंबई : अंधेरी येथील पोटनिवडणुकीत राजकीय आखाडा तापल्यानंतर या निवडणुकीतून भाजपने माघार घेतली होती त्यामुळे लटके यांचा विजय निश्चित असला तरी निवडणूक होत असल्याने निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. पोटनिवडणुकीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झाला आहे.
एकतर्फी विजय होता निश्चित
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक झाली होती. यात भाजपने उमेदवार न दिल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे मानले जात होते. आणि झालेदेखील तसेच. मात्र या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यात दुसर्या क्रमांकावर नोटा हा पर्याय राहिला. कदाचित हे देशातील या स्वरूपाचा हा देशातील पहिलाच प्रसंग असावा.


नोटाचा सर्वाधिक पर्याय
आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. पंधराव्या फेरीच्या अखेर ऋतुजा लटके यांना ५५ हजार ९४६ मते मिळाली तर तब्बल १० हजार ९०६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. दरम्यान, पुढीलप्रमाणे उर्वरित उमेदवारांना मते मिळाली. बाळा नाडार -१२८६; मनोज नाईक – ७८५; मीना खेडेकर – १२७६; फरहान सय्यद – ९३२; मिलिंद कांबळे – ५४६; राजेश त्रिपाठी – १३३०.
दरम्यान, या माध्यमातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभेत आपले खाते उघडले आहे.