नागरीकत्व कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करा : भुसावळात प्रांतांना निवेदन
भुसावळ : नागरीकत्व कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करावे, अशी मागणी प्रांताधिकार्यांकडे भुसावळातील मुस्लीम पंच कमेटीतर्फे निवेदनाद्वारे सोमवारी करण्यात आली. या विधेयकामुळे मुस्लीम धर्मियांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कायद्याला समाजाचा विरोध असून सदरील कायदा पास झाला असलातरी तो संविधानाच्या तरतुदीप्रमाणे नसल्याने हा कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या कायद्यामुळे देशात लोकसंख्येचा स्फोट होण्याची शक्यात असून बेरोजगारीसोबतच गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाची प्रत राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठवण्यात आली आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर अॅड.वसीम खान, हाजी सलीम पिंजारी, हाजी आशिक खान शेरखान, माजी नगराध्यक्ष हाजी शफी शेख अजीज, माजी नगरसेवक साबीर मेंबर, मौलाना अब्दुल हकीम खान, मौलाना कमरूद्दीन, हाफीज गुलाम सरवर, हाफीज नूर आलम, हाफीज अखलाक, हाफीज गुलाम जिलानी, हाफीज सुल्तान रजा, कब्रस्थान कमेटी अध्यक्ष युसूफ खान मोहम्मद खान, बागवान युवा फाऊंडेशन अध्यक्ष साजीद सलीम बागवान, डॉ.इम्रान रऊफ खान, इम्तियाज अहेमद, मो.मुन्वर खान, महेबूब खान, सिकंदर खान, रहिम मुसा कुरेशी, राजू चौधरी, सलीम गवळी, अकील शाह यांच्यासह समाजबांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.

