मानमोडीच्या प्रवाशाचे बसमधून पाकिट लांबवले
बोदवड : तालुक्यातील मानमोडी येथील बाळु सदाशिव पाटील हे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बोदवड-जळगाव बसने मानमोडी येथे जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांचे पाकिट लांबवले. पाकिटात चार हजार 500 रुपयांची रोकड होती. तिकीटासाठी खिशात हात घातल्यानंतर बाळू पाटील यांना पाकिट चोरी झाल्याचे लक्षात आले. बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार कालिचरण बिर्हाडे तपास करीत आहेत.

