भुसावळातील गणेश कॉलनीतून दुचाकी लांबवली
Bike extended from Ganesh Colony in Bhusawal भुसावळ : शहरातील गणेश कॉलनी भागातील घराबाहेरून चोरट्यांनी 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी शहर पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात गुन्हा
शहरातील गणेश कॉलनीतील गणपती मंदिराजवळून सलीम अहमद अलीमोद्दीन खतीब (45, शासकीय विश्रामगृह, भुसावळ) यांच्या मालकिची दुचाकी (एम.एच.19 सी.एम.2886) ही चोरट्यांनी 5 ते 6 नोव्हेंबरदरम्यान लांबवली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी न आढळल्याने शहर पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विकास बाविस्कर करीत आहेत.

