भुसावळात नैराश्यातून एकाची तापी पात्रात आत्महत्या
l भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
A person commits suicide in Tapi vessel due to depression in Bhusawal भुसावळ : मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्यातून शहरातील आरएमएस कॉलनीतील रहिवासी असलेले राजू भादवेलकर (50) तापी पात्रात आत्महत्या केली. गुरुवार, 10 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
शिवपूर कन्हाळा रोडवरील आरएमएस कॉलनीतील रहिवासी राजू भादवेलकर हे गुरूवारी सकाळी घरून निघाले. गाडी धुवून येतो असे त्यांनी घरी सांगितले होते मात्र गुरूवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांनी दुचाकी (एम.एच.19 डी.पी.0274) ही तापी नदीच्या पूलावर लावली व त्यांनी थेट तापी नदीत उडी मारली. यामुळे पूलावरून ये-जा करणार्या लोकांनी पूलाच्या कठड्याकडे धाव घेतली मात्र तो पर्यंत राजू हे खाली पाण्यात खडकावर पडले होते.


शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
शहर पोलिस ठाण्यात माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विनोद कुमार गोसावी, हवालदार सुपडा पाटील, रईस शेख यांनी तापी नदी गाठली, सुपडा पाटील यांनी रीतसर पंचमाना केला. यावेळी काही पोहणार्यांच्या मदतीने मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आला. भुसावळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने आरएमएस कॉलनीत हळहळ व्यक्त करण्यात आली. शहर पोलिस ठाण्यात हेमंत बाळू कोळी यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.