भुसावळातील कृष्णा खरारे एक वर्षासाठी हद्दपार


Krishna Kharare of Bhusawal exiled for one year भुसावळ : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गौरव बढेसह चौघांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आली असतानाच भुसावळ प्रांताधिकार्‍यांनी शहरातील कृष्णा खरारे याला एक वर्षासाठी जळगाव जिल्हयातून हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढले असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

आणखी काहींची होणार हद्दपारी
शहर पोलिस ठाण्याकडून हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर प्रांत रामसिंग सूलाणे यांनी हद्दपारीचे आदेश काढले. प्रांत कार्यालयात अजूनही हद्दपारीच्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू असल्याने उपद्रवींच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !