खिर्डीत ढाब्यावर अनधिकृत दारू विक्री भोवली : ढाबे चालकास 25 हजारांचा दंड
Unauthorized sale of liquor at dhaba: Dhaba driver fined 25 thousand भुसावळ : रावेर तालुक्यातील खिर्डी येथे एका धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाागाच्या पथकाने बुधवार, 9 नोव्हेंबर रोजी अचानक छापा टाकत अवैधरीत्या विक्री होणार्या दारूला आाळा घालत ग्राहकांसह ढाबा मालकावर कारवाई केली. उभयंतांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ढाबा चालकास 25 हजारांचा तर पिणार्यांना प्रत्येकी तीन हजाराचा दंड करण्यात आल्याने अवैधरीया दारू विक्री करणार्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली.
कारवाईने उडाली खळबळ
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, सुनील चव्हाण, विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ, (नाशिक) अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारु गुत्ता व ढाब्यांवर अवैधरित्या मद्यसेवन करणार्या ग्राहकांवर व त्यांना सेवा देणार्या दारु गुत्ता व ढाबा चालक, मालक यांच्यावर विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या पथकाने कारवाई केली. खिर्डी येथे तीन हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ढाबा चालक डिगंबर कोळी व ढाब्यावर मद्यसेवन करतांना ज्ञानेश्वर पंढरीनाथ कोचुरे व भास्कर लक्ष्मण कोळी आढळुन आल्याने त्यांच्यावर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला.संशयीतांची वैद्यकीय तपासणी करीत न्यायालयात दोषारोप सादर केल्यानंतर ढाबा चालकास 25 हजार व मद्यसेवन करणार्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये अश्या एकूण 35 हजार रुपयांचा दंडांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता नितीन खरे यांनी युक्तीवाद केला.


यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, सतीष पाटील ( यावल) तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान, वाहनचालक सागर देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक, मधुकर वाघ, नितीन पाटील, विठ्ठल हाटकर, योगेश राठोड यांनी कारवाई केली. शासनाने मंजुर वाईन शॉप, देशी दारू दुकान, बियर शॉपी व परमीट रुम मधुनच मद्यसेवन परवाना प्राप्त करुन मद्यसेवन व मद्य खरेदी करावी. कुठल्याही सार्वजनिक व अवैध ठिकाणी मद्यसेवन करू नये, असे आवाहन निरीक्षक सुजीत कपाटे यांनी केले आहे.