शिंदे गटाची मोठी खेळी : सुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात ! ; आज होणार प्रवेश सोहळा


Shinde group’s big move: Sushma Andhare’s estranged husband in Shinde group! ; Admission ceremony will be held today मुंबई : ठाकरे गटाची मुलूख मैदानी तोफ म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना धक्का देण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी खेळली असून त्यांच्या विभक्त पतीला शिंदे गटात रविवारी प्रवेश देण्यात येत आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे रविवारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. वाघमारे यांना शिंदे गटात मोठं पदही दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुषमा अंधारे या बॅकफूटवर जाव्यात म्हणून शिंदे गटाने ही मोठी खेळी खेळली आहे.

अंधारे यांच्यासाठी हा मोठा धक्का
ठाकरे गटातील फायर ब्रॅण्ड नेत्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करतात मात्र त्यांना धक्का देण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले पतीच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अंधारे यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. रविवारी दुपारी सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. टेंभी नाका येथील आनंद मठात हा प्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हा पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. अंधारे कुटुंबीयात फूट पडली आहे.



मिळेल ती जवाबदारी पार पाडणार : वैजनाथ वाघमारे
वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं की ‘आम्ही दोघं अनेक वर्षांपासून विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका पटली म्हणून मी त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे. त्यांच्यासमोर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी हो म्हटलं आणि आज प्रवेश करत आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडेल, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !