नाडगाव येथे 19 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या


A 19-year-old youth committed suicide by hanging himself in Nadgaon बोदवड : तालुक्यातील नाडगाव येथे 19 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार, 13 रोजी मध्यरात्री रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. परमेश्वर गजेंद्र पाटील (19) असे मयताचे नाव आहे. तरुणाने आत्महत्या का केली? याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
सूत्रांच्या माहितीनुसार, परमेश्वर गजेंद्र पाटील (19) या तरुणाने शनिवारी मध्यरात्री दोन वाजेपूर्वी घरामागील कुट्टी ठेवण्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी जितेंद्र बाबूराव पाटील यांच्या खबरीवरून बोदवड पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास कॉन्स्टेबल सचिन चौधरी करीत आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !