दीपनगरला सकल लेवा समाजाचे स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा


भुसावळ : तालुक्यातील दीपनगर येथे सकल लेवा समाजाचा स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात झाला.  अध्यक्षस्थानी लेवा समाजाचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील सपत्नीक उपस्थित होते.  कार्यक्रमात इयत्ता दहावी, बारावीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी समाजाविषयी प्रबोधन आणि समाजात उच्च शिक्षितांमध्ये होत असलेल्या घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्याविषयी रमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता सातवीतली चिमुकली अनुष्का पाटीलने ही समाजाविषयी माहिती दिली. कार्यक्रमात चालता-बोलता आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन कविता चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी पाटील व जे.पी.पाटील यांनी केले. कार्यक्रमास अध्यक्ष बी.के.पाटील, उपाध्यक्ष लोमेश भंगाळे, सचिव विनोद भिरूड, सहसचिव श्रावण बोरोले, नितीन रडे, आर.जी.पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमास समाजातील सुमारे 250 समाजबांधव व कंत्राटदार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निश्चल झोपे, नितीन चौधरी, प्रितेश पाचपांडे, सतीश महाजन, भरत सरोदे, स्वप्निल चौधरी, प्रमोद पाटील आदींचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !